हजलः
काव्यसंग्रहच माझा फेकून मारीन मी
ठेवलीत जर नावे तर ठार मारीन मी
ऐकवू मग कुणाला कविता नवी देखणी
फिरवलीत जर पाठ तर गझलच मारीन मी
चांगलीच जमते आता, हेच ऐकेन मी
ना नमस्कार आता बैठकच मारीन मी
पारितोषिक मला जर नाही दिलेत तर मग
गावभर मग दवंडी अन बोंब मारीन मी
चेहरे तर जरा आनंदीच ठेवा बघू
तीक्ष्ण शब्द जर आले तोंडात मारीन मी
ऐकता फुकट आणि तरी टोमणे मारता
एक शेर तुमचा ऊपाशीच मारीन मी