मोहात मी पडतोच का पुन्हा पुन्हा
डोहात मी पडतोच का पुन्हा पुन्हा
खोटाच आव कशास तो पुन्हा पुन्हा
शोकात मी पडतोच का पुन्हा पुन्हा
का तोंड घालत बोलतो पुन्हा पुन्हा
दोघात मी पडतोच का पुन्हा पुन्हा
हे काय मी करतो असे पुन्हा पुन्हा
चोरात मी पडतोच का पुन्हा पुन्हा
ढकलू नका मजला असे पुन्हा पुन्हा
कोनात मी पडतोच का पुन्हा पुन्हा