घमेली

मैलभरल्या विचारांची

दुर्गंधी घमेली
पांघरुणे संवेदनांवर
घ्राणेंद्रिये निद्रीस्त झाली
संयमास डसली
आक्रस्ताळी रखेली
अभिलाषेच्या बटीकांची
चौकाचौकात मांदियाळी
भुकेपोटी खिंकाळी
चिरकली डरकाळी
विस्तारलेल्या भाळी
अस्ताव्यस्त टीकली
ऊंचावरी स्वप्नशिंकाळी
सुखाचा शिडकावा अवकाळी
दवाळलेल्या सकाळी
सुगंधाचे पूर चमेली