घाव होता

घातला तो खोल वर्मी घाव होता

सूड घेणे हाच तीचा डाव होता
कौतुकाने बोलणे ते ढोंग होते
सभ्यतेचा नाटकी तो आव होता
कोण जाणे काय आता होत आहे 
शांतता ही मूक, आत तणाव होता
गाठला पल्ला, कसा ना जाणतो मी?
केव्हढा तोही अवघड चढाव होता
डागल्या गोळ्या  चुकीच्या सावजावर
काळजाचा नेमका तो ठाव होता 
फसवले तीने मला हे सत्य होते 
ऐकणारा तो मुजोर जमाव होता
हृदय माझे, खेळणे केलेच होते
मीच होतो चोर, तो तर साव होता
हो ! म्हणाली एकदाची भेटण्याला
धूर्त आता, मांडला मी, डाव होता