अपेक्षा

माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण कोणते असेल तर ते म्हणजे
"अपेक्षा."
जन्माला आल्या आल्या त्या तान्हुल्या बाळाकडून आपणा अपेक्षा करायला सुरुवात करतो.
ज्याने पण अ,आ,इ,ई हि बाराखडी बनवली ना त्याने पण मुद्दामच "अ" हे अक्षर पहिल्या क्रमांकावर लिहिलेय.
जेणेकरून लहान मुलं जेव्हा शाळेत जाईल आणि बाराखडी शिकेल तेव्हाच त्याला पहिल्यांदाच कळेल की
"अ" कश्यातला???.........

"अपेक्षा" मधला.
"आ" कश्यातला??.........."आशा" मधला .
अपक्षांचे ओझे दोघांनाही जगू देत नाही,
"ज्याच्या कडून अपेक्षा केली जाते" त्याला सुद्धा
आणि
"जो" अपेक्षा करतो त्याला सुद्धा.

आयुष्यात दोनच गोष्टी असतात.
एक "देणं" आणि दुसरे "घेणं"
पण.....
"देणं" हे बहुतेकदा दुर्लक्षित करायचे हे ठरलेले असते
आणि
"घेणं" हे हक्काचे मानलेले असते.

"देणं" हे नुकत्याच झालेल्या ताज्या जखमेसारखे असतं,नेहमी बोचत राहणारं आणि त्यामुळे सारखे लक्षात राहणारं
आणि "घेणं" हे विस्कटलेल्या केसासारखे असतं,कशी चुकून आरशात पाहिलं तरच लक्षात येणारं.
एक साधं उदाहरण घ्या ना,
तुम्ही मित्राला १०० रुपयांची नोट उधार दिली तर ती चांगली लक्षात राहते
आणि तिचा नोट तुम्ही उधार घेतली,की ती सहसा विसरायला होते.

किती हा शब्द "सुख,दु:ख,आनंद,त्रास,समाधान" यांसाठी नसतोच,
"सुख,दु:ख,आनंद,त्रास,समाधान" या भावनांसाठी एकक नसते,
किती सुखी आहेस?......किती दु:ख होतंय?.....किती समाधानी आहेस?
काय उत्तर देणार या प्रश्नांचे????
परमेश्वराने ना संपणारे आभाळ बनवले ना ते ह्याच कारणासाठी बनवले असेल बहुतेक,जेणे करून तुम्ही या प्रश्नाची उत्तरं देऊ शकाल,
किती सुखी आहेस?......किती दु:ख होतंय?.....किती समाधानी आहेस?
असा प्रश्न कुणी विचारले ना की,त्या आभाळाकडे बोटं दाखवायचे आणि उत्तर द्यायचे.
"त्या" आभाळा एवढा सुखी आहे.
"त्या" आभाळा एवढं दु:ख आहे.

आपल्याला कुणी विचारले ना की,"काय हवंय तुला?".की आपण मनाला विचारतो,
आणि मग मन एक यादी जमा करून देते,
पुन्हा समोरच्या व्यक्तीने विचारले,"इतकंच हवंय ना?अजून काही नको ना?"
मग पुन्हा आपण मनाला विचारतो,
आणि मग मन पुन्हा अजून एक छोटीशी यादी आणून देतं.
खरेतर
प्रश्न पण छोटा असतो आणि त्याचे उत्तर पण छोटे आणि सोप्पे असते.

प्रश्न असतो,"ये मना,तुला काय हवंय?"
आणि
उत्तर असते,
"सगळं".