हलद

उद्या लगीन गो बालाचा

त्याच्या अंगाला हलद लावा
विड्याचा पान घ्यावा
नसला तर पिपलाचा घ्यावा
हृदयापासून हलद वर चढवा
हृदयापासून हलद खाली उतरवा
बालाने इचारले ब ला (आईला)
ब, कला लावतांन ही हलद
ब बोतली (बोलली)
हलद आनी पानामुळे अंगाला तेजी येते
सोन्यासारखा झळाळतो अंग
आन
सूर्यकीरणात अस्तो लै ताकद
म्हनून तवाच लावतात हलद
हलदीच पिवला रंग,
गुलालाच न्यारा आन
अबीर तो गहरा
सकाली सकाली हल्दीने उत्साह येतो, चैतन्य येते
दुपारचा गुलाल रक्ताळलेले (खडतर)आयुष्य दाखवतो
संध्याकालचा अबीर पैलतीर दावतो
ही सारी हलदीचीच रुप रे
उत्पत्ती, स्थीती, लय
सारे हल्दीन सामावलेले
सारी जिवनाची तत्त्व पन हलदीन आस्तान रे 
आसा बघ..
पान्याचा स्पर्श होला.. जलतत्त्व आले
पाय जमीनीवर..       पृथ्वीतत्त्व आले
सूर्यप्रकाशाने ..       तेजतत्त्व आले
वाहतो सुगंधी, प्रेमाचा वारा.. वायुतत्त्व आले
ह्या साऱ्याने वातावरण प्रसन्न झाले.. प्रकाशतत्त्व आले
मुसळ, ऊखळ, पाने, .... काष्ठतत्त्व आले
ह्या हलदीचा लै इचार केला पुर्वजांनी
उगाच नाई लावत हलद समद्या अंगास्नी
रोगप्रतिबंधक, वज्रदेही बनवते ही हलद
नवरा-नवरीला लागली बदललेली हलद
दोन जीवांच्या मिलनाआधी
वातावरणात योग्य बदल करते हलद
हलद म्हणजे मुळ रंग
ऐतिहासिक ही हलद
जन्मल्यावर हलद
तरुनपनी हलद
मेल्यावर बी हलद
(ईजिप्तमध्ये ममी'जना हळद लावलेली आढळली)
खंडोबाच भंडारा ही हलद
..कपाली लावा
आज्ञाचक्र चालतो जलद
.. हवेमध्ये ऊधला
हवापन होते शुद्ध आनी धुंद
हलदीमुळे नाही होत रोगराई
नाही पसरत दुर्गंध
अशी दिव्यौषधी ही हलद
समारंभ ह्यो देवाचा
निसर्गाच्या पुजनाचा 
मानसाला निसर्गाशी जोडन्याचा
माझ्या आग्री बांधवानो
फुका पैशाचा नास नका करू
दारू-मटनाने हवा नका तापवू
साधी भोली हलद
तीला श्रीमंती नका दाखवू
आनंद घ्या, आनंद द्या 
हलद लावण्याच्या मुळ ऊद्देशाला
नका उगा गालबोट लावू 
**कोणीही रागावू नये
** समाज-प्रबोधन हा एकमेव ऊद्देश
** सर्व जातीत हळदीचा कार्यक्रम असतो
      पण बऱ्याच वेळा ऊद्देश माहीत नसतो, म्हणून 
      हे मुक्त "मनोरंजनात्मक रंगण"
    डोक्यावर ताटली घेऊन देवाचा आशीर्वाद घेण
    ताटलीखाली हळद आणि बुक्का लावतात
    जीवनाची सुरुवात आणि अंत दर्शवितात
... आणि पिंगण हे माणसांसाठी
...... ह्यातील बरीच माहिती 
         श्री. बाळ बेंडखळेसरांच्या प्रदीर्घ अनुभवातुन.
... ‍ जे चूक ते सारे माझे.