" दिवा स्वप्न"
एकदा मलाही वाटले व्हावे,
खासदार ।
म्हणून मी जाऊन ठोठावले,
एक खास दार॥
बैट घेऊन सचिन,
दारात उभा होता।
सारखी बैट तो ,
हवेत फिरवत होता॥
निरनिराळ्या खासदारांचे,
चित्र समोर होते।
सचिनला बॉल शिवाय,
काही दिसत नव्हते॥
संसदेत बोलण्याचा तो,
सराव करीत होता।
बैट अन बॉल शिवाय तो,
काही बोलत नव्हता॥
त्याची पाहून फजिती मी,
सोडून दिला विचार।
मी अपुला नागरिक बरा,
" नको खासदार"२॥
अनंत खोंडे.
१६।५।२०१२.
कोलंबस. अमेरिका.