" भावी नेता"
एकदा रस्त्यात एक,
टोपी दिसली।
त्यावरून वाहने गेल्याने,
ती होती मळाली॥
तिचा रंग काही कळत नव्हता।
तिला झटकली तर रंग निळा होता॥
मनांत आले कोणत्या,
पक्षाची ही असावी।
घरी नेऊन धुऊन ती,
पक्ष कार्यालयात द्यावी॥
धुतल्यावर तिचा रंग ,
सर्व गेला।
न कळे कसा मग रंग,
भगवा झाला॥
पुन्हा रगडून साबणाने,
धुतली तर!।
त्यावर घड्याळ,
चमकतं होते॥
पुन्हा एक जोराचा ,
घसाडा दिला,
घड्याळ्याचे रूपांतर'
पंज्यात झाले होते॥
मग कळेना काही ही,
टोपी कोणास नेऊन द्यावी।
आता आपणच ती घालू,
नी," नेता होऊ भावी"
अनंत खोंडे.
१६।५।२०१२.
कोलंबस, अमेरिका.