कधी माझ्यासवे......

कधी माझ्यासवे गोड बोलायचा साहेबही   
जरा गुंगावता पोचायचा साहेबही   
  
उघडे ना पापणी, जेवून कॅंटीनचा डबा  
कसा येवून तेंव्हा झापायचा साहेबही  
  
*कुणी मज थांब म्हणताना, मला अडवायला   
कसा वेळीच तेंव्हा यायचा साहेबही  
  
मला पाहून भोळा विरघळे रुसवा कसा  
कशा युक्त्या तरी फसवायचा साहेबही  
  
कशी भर एसीतही आग माझी व्हायची   
मला जेंव्हा असा सोलायचा साहेबही  
  
अता **अर्जावरी या फक्त झुरलेल्या मणा   
कधी स्मरणे अशी, ठेवेल का?   साहेबही   
  
  रुपेश बक्षी
  
  
* office  मध्ये over time साठी  
  
** सुटीच्या अर्जावर