एकटेपण तेवढे गाते मला

एकटेपण आपले वाटे मला

होउ दे आता जरा माझे मला
कर्ज स्वप्नांचे तुझ्या फेडू कसे
आठवांचे तू दिले खाते मला
दोन भुवयांच्या मधे जे रेखले
पाहिजे होते तसे नाते मला
जीवना रे श्वासश्वासांच्या मधे
रोज हे दळते तुझे जाते मला
ऐकण्यासाठी मना तू कान हो
एकटेपण तेवढे गाते मला
              दि. २०-मे-२०१२... मयुरेश साने