पर्जन्यराजाला आवताण....
काळे कुट्ट मेघ माथी
गाती तुझेच पोवाडे
वीजबाई ओवाळिते
कानशिली बोटं मोडे
तुझ्यासाठी उतू गेला
गंध मातीचा आगळा
ढेकूळही सजे वेडे
घेते रंग ते हिरवा
तुझा संग होता राजा
फूल फुलते देखणे
थेंब तुझे मोती होती
कणसात दिमाखाने
तूच राजा परजन्या
नको करुस उशीर
झाली प्रजा उतावीळ
हाक मारते शिवार.....