सारेच खाण्याचा लळा असावा
सोकावला गोतावळा असावा
रेषा समांतर भांडल्या किती त्या
रक्ताळलेला तो फळा असावा
जीवावरी तो आप्तही उठावा
अवतार माझा बावळा असावा
हे घालते का दुःख्ख येरझारा
रस्ता मनाचा मोकळा असावा
आशा उगा ती लागली वहाया
झेपावला शुष्क धुरळा असावा
जागा तिच्या शेजारची रिकामी
ऊद्देश काही वेगळा असावा
का गुप्त गाठी आत त्या जमाव्या
नाठाळ माझा कोथळा असावा