उन्हं फिरायला जातात तेंव्हा

उन्हं फिरायला जातात तेंव्हा
संध्याकाळ भेटायला येते
थकलेल्या पंखांना तेंव्हा
घरट्याची आठवण येते

सरता सरता संध्याकाळ
चाहूल रात्रीची होते
काळी चादर ओढून जेंव्हा
क्षितिज कूस बदलते

चिमण्या पिलांना ऊब
द्यायचे मग राहूनच जाते
नकळत रात्रीच्या कुशीत जेंव्हा
पुन्हा पहाट उगवते..