ताज पाहिजे ...

मस्ती पाहिजे,  माज पाहिजे
'तिथे' थोडीशी,  खाज पाहिजे

माणूस हा वागेल कसा  
त्याचा जरा अंदाज पाहिजे

काल खूप  ऐकून घेतले 
सूड उगवण्या आज पाहिजे

नुसती  जिभेला  धार नव्हे तर
खणखणीत आवाज पाहिजे 

चार शिव्या त्या, हासडताना
अरेरावीची, गाज पाहिजे

डोक्यामध्ये जाणाऱ्यांच्या,
वेडेपणाला इलाज पाहिजे

मनातली चंगळ लपवायला 
दाखविण्या कामकाज पाहिजे 

काल केलेल्या उपकारांवरती 
रोज वाढणारे व्याज पाहिजे 

शिकण्याकरता दुनियादारी 
अनुभवांचा  रियाज पाहिजे 

खेळून संपले डाव सारे की,
शेवटी निजाया ताजं पाहिजे

- अनुबंध