शंख म्हणती मोठ्या गोगलगायीच्या कवचाला
घंटा देव्हाऱ्यात एका बाजुला
शंख दुसऱ्या बाजुला
टोक चैतन्याचे देवाच्या दिशेला
ध्वनी, कंपने, नाद दोहोला
घंटा वाजताच, शुद्ध वातावरण वातावरण खालील
शंख वाजताच, निर्जंतुक ते वरील
शंख दोन प्रकारचे असती
एक असतो दक्षिणावर्ती
(उजव्या तोंडाचाः घड्याळाच्या विरूद्ध )
ऊत्पती स्थिती दर्शविती
विष्णुला ह्या शंखाची प्रीती
लक्ष्मी, बहिण शंखाची प्रसन्न होई चित्ती
दुसरा वामवर्ती
(डाव्या तोंडाचाः घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे)
लय दर्शविती, शिवाला खुप आवडती
चार हात विष्णुचे
शंख, चक्र, गदा, पद्माचे
मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंहावतार विष्णुचे
प्रत्येकाच्या हाती स्थान शंखाचे
ऊजव्या तोंडाचा प्रतिक ऊत्पत्तीचे, स्थीतीचे
डावीकडे ते स्थान लय,शिवाला ते प्रिय
कृष्ण अवतार विष्णुचा
पांचजन्य शंख तो कृष्णाचा
शंख विठोबा, जगन्नाथाचा
सुर्य, ईंद्र, मुरुगन(स्कंद),
वैष्णवी, दुर्गा, ईत्यादी देववृंद
शंख सर्वांना करतो मंत्रमुग्ध
गंडकी नदीत शाळीग्राम सापडती
त्यावरी शंख, चक्र, गदा, पद्म आढळती
त्यांना केशव संबोधिती
मधुसुदन, दामोदर, संकर्षण, ऊपेंद्र
साऱ्याना शंखाने वदिती
महाभारतातील हे शंख प्रत्येकाचे
पांचजन्याने युद्ध पुकारे
युधिष्ठीरः अनंत विजय
भीमः पौंड्र-खडग
अर्जुनः देवदत्त
नकुळः सुघोष
सहदेवः मणिपुष्पक
शंख बुद्धाच्या जातककथेत
शंख नागांच्या कथेत
शंख औषधी मात्रेत
असा हा शंख
प्रतिक बुद्धीमत्तेचे,
सत्त्याचे, प्रारंभ निर्देशाचे