वारी...
ज्येष्ठ सरता सरता
लागे ओढ पावसाची
त्याही आधी वाटे जीवा
कधी जाई पंढरीसी
ओढ लागे माऊलीची
तुकोबांच्या पादुकाची
चला जाऊ पंढरीसी
संत हाका मारताती
टाळ घुळघुळा करी
मृदुंगाची साथ वरी
वीणा शोभे खांद्यावरी
मुखे राम कृष्ण हरि
अशी वाट पंढरीची
सुख पाऊली पाऊली
पाहू अंतरात त्यासी
वाचे विठाई विठाई
मुखी माऊलीचा पाठ
तुका नामा जनी संगे
असे दिसा यावे जावे
का बा गणती करावे
जन्ममरणाचे दु:ख
निवारीते पूर्णपणे
संत सांगती गर्जून
करा वारी जीवेप्राणे ...