सांज सावल्या

सांजसावल्या...

छळती मज या सांजसावल्या
आठवणीच्या काळ्या बाहुल्या

भेटीच्या आशा पालवल्या
डोळ्यात साठल्या सांज सावल्या

युगांतराने तरी भेट होईल का?
पुन्हा आठवणींची भेट देशील का?

अजुनी पाहती वाट तुझी
डोळ्याच्या या निस्तेज बाहुल्या

राजेंद्र देवी....