शुष्क रेखिव नजारे तुझ्याविना
हे तृषार्तच किनारे तुझ्याविना
शिरशिरी, खुमारी, लाघवी अदा
खिन्न लोभस शहारे तुझ्याविना
शोधतेस का तू अनिलला प्रिये
वाहिलेच ना वारे तुझ्याविना
वाटले तुला 'मी टाळले तुला'
शुन्य भासते सारे तुझ्याविना
भेटतेच ना रत्नाकरा नदी
जीवन सगळे खारे तुझ्याविना