पहिले वर्ष असेच सरले,
आमचे आयुष्य जसे फुलून आले!!!
पहिल्यांदा जेव्हा तुझे रडणे ऐकले,
ते एकच क्षण आमच्या आयुष्यातले,
आमच्या चेहऱ्यावर हसू होते आणि
तुझ्या डोळ्यात पाणी पाहावेसे वाटले,
पहिले काही क्षण असेच सरले,
तुला बघताच आमचे मन भरले,
पहिले वर्ष असेच सरले......[१]
पहिल्यांदा जेव्हा तू डोळे उघडले,
ढगाळ वातावरणातही सूर्य किरण लखाकले,
साऱ्या सृष्टीने जणू तुला मिठीत घेतले,
आनंदमय अंगणात जसे मोर नाचू लागले,
पहिले काही दिवस असेच सरले,
तुझ्या डोळ्यातच संपूर्ण आयुष्य बघितले,
पहिले वर्ष असेच सरले...... [२]
हळूहळू तुझ्या हातांचे इशारे कळाले,
पायातली पैंजण वाजू लागले,
तुझ्या हसण्याची खिणखिण जेव्हा कानी पडली,
पूर्ण दिवसाची थकावट त्यातच संपुष्टात आली,
आपल्या परिवारातली तू बाहुली,
लक्ष्मीच्या रूपात आम्हा "परी" लाभली,
पहिले वर्ष असेच सरले...... [३]
फुलपाखरांचे पंख तुझ्यातच बघितले,
तुझ्या नाजुक देहाला हातातच ठेवावेसे वाटले,
तुला निजताना पाहून अंगाई गीत आले,
तुझ्या ओढीतच सगळे सुख जाणले,
बारा महिने झटकन उलटले,
३६५ दिवसांचे जसे एक स्वप्न पाहिले,
पहिले वर्ष असेच सरले,
जगण्यासाठी एक कारण सापडले!!!......[४]
-यशपाल पाटील (९९७००११८३९)