भाबडे माझ्या रथाचे दूसरे चाक
सारखी होते विचारांचीच दमछाक
संपली शाई, झटकले सारखे टाक
मारली जोरात नियतीनेच चपराक
पाळले ना एकही आश्वासन कधीच
मीच खोटा आज होते छापले ता. क.
सारखा गेला बळी माझाच हकनाक
"प्रेम आहे " ऐकता मी होतो अवाक
पोरट्याना लाज नाही राहिली आज
मान ना कोणास, नाही राहिला धाक