रावणाकडून प्रलोभन

राम तुझ्या जीवनी नाही
वदन तुझे सुकले पाही
तव लोचनी कष्ट दिसती
थकुनी दृष्टी पायी नमली

बघ विचार करोनी माझा
लंका वैभव अर्पण तुजला
देव दानव वश मजला
तव इच्छा आज्ञा मजला

तुझा शब्द माझे इष्ट
कौल देई आता स्पष्ट
नको लावू वैभवासी दृष्ट
करीन तुझे भविष्य भ्रष्ट

"अरे पातक्या , अहंकाऱ्या
भुलविले मायेने तुज घातक्या
रघुनंदन हीच माझी गती
दूर हो ! भ्रष्ट तुझी मती