शोधतो चित्र माझे आज मीही
सावलीला नकोसा आज मीही
टोळकी ती टवाळांचीच होती
त्यात सामील झालो आज मीही
शक्य नाही जराही नम्र होणे
बोचतो या जगाला आज मीही
पुण्य आले परसदारी विकाया
त्याच रांगेत ऊभा आज मीही
ना कधी आदराने वाकलो मी
नाव माझे लपवतो आज मीही
वेदनेचा जरासा स्पर्श झाला
रक्तबंबाळ झालो आज मीही