आनंदाचा घनु....

आनंदाचा घनु....

झुरुमुरु अवतरे
कसा आनंदाचा घनु
त्याचे तुषार झेलण्या
चल अंगणात जाऊ

चारी दिशांनी वर्षतो
घनु आगळा वेगळा
कण साठवोनि आत
भोगू आनंदसोहळा

पूर्ण उभारुन वर
हात मोकळे असूदे
कण आनंदाचे तरी
येती हातासी आघवे

कण साठवाया आत
जागा मोकळी असावी
अडगळ कोणतीच
तेथे कदापि नसावी

घन सदाच वर्षतो
थांबण्याचे नाव नाही
मीच घाली आडकाठी
दोष घनाचा तो नाही......