माझं गाव
सुंदर माझ गाव आहे
बिरवाडी त्याच नाव आहे
महाड तालुक्यात मोडत आहे
सह्याद्री रांगांच्या कुशीत आहे
सावित्रीच्या काठावर उभे आहे
शिवरायांचा रायगड जवळच आहे
रामदासांची शिवथर घळ हि आहे
गरम पाण्याच्या झऱ्यांचा साठा आहे
भातशेतीचे वरदान आहे
प्रत्येकाच्या घरामागे विहीर आहे
आंब्या फणसाची लूट आहे
सार्वजनिक उत्सव सण साजरे होत आहेत
माणुसकीचा झरा वाहत आहे
औद्योगिक क्रांतीचा वसा घेतला आहे
माणूस बदलत चालला आहे
गावाचं गावपण तसच आहे
माझं गाव लई न्यार आहे
Prachi karve