एकादशी

एकादशी

कृष्ण व शुक्ल पक्षातील हा अकरावा दिवस
चंद्र एकदा पृथ्वीजवळ व एकदा लांब
हिंदू आणि जैन मानिती हा शुभ दिवस
करावा ह्या दिवशी उपवास
उप म्हणजे जवळ, वास म्हणजे निवास
उपवास म्हणजे देवाचा सहवास
पावित्र्य म्हणजे एक मोठाच प्रवास
आईचे बालकावर जसे प्रेम
झिजते आयुष्यभर, पण पारखी श्रेयास
कोणीतरी कोणासाठी झिजणे महत्सायास
हे झिजणे आवडते देवास
तो स्वतः येतो सहकार्यास
उपवास हेही एक झिजणे
देवासाठी व दुसऱ्यांसाठी वेळ काढणे
म्हणून एकादशीसाचा उपवास
पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये अशी ही दहा
आणि अकरावे महत्त्वाचे ते मन
एकादशी म्हणजे मनाने ईश्वराला पाहा
एकादशी म्हणजे नाही फक्त खाण्यातला बदल
एकादशी म्हणजे व्हावा आचरणातही बदल