'आजी सोनियाचा दिनू' ह्या संत ज्ञानेश्वरांच्या प्रसिद्ध अभंगावर रचलेले 'विडंबन'
हाची सोनियाचा सोनू
मंत्री मंडळात आणू
हाची सोनियाचा सोनू
प्रणब कटतासी...कटतासी...
दिग्गी लागलाय बोलू
त्याचे जोडे उचलोनी
त्याचे चमचे म्हणोनी चालू
आणू सोनियाचे पिल्लू... आणू सोनियाचे पिल्लू
मनमोहना रे... मोहना रे...
तुझा भरलासे काळ
झाली निघण्याची वेळ
आता लवकर पळ
आले सोनियाचे बाळ... आले सोनियाचे बाळ...
शरद उखडला... उखडला...
त्याचा 'दुसरा' नंबर गेला
छोकरा कानामागून आला आणि
भलताच तिखट झाला
हेची सोनियाचे खल... हेची सोनियाचे खल...
डोळे आतुरले... आतुरले...
पाहण्या मंत्री इटली पुत्र
अन्य झाले गलित गात्र
विचारी कोण त्यांसी कुत्रं?
हेची सोनियाचे तंत्र... हेची सोनियाचे तंत्र
युवराज झुकले रे... झुकले रे...
चाळीस उलटोनी गेलं
अजुनी लग्न नाही झालं
गांधी घराणं संपेलं
हिची सोनियाची सल.. हिची सोनियाची सल...
बाळा घेऊनी ये ... घेऊनी ये...
मज स्नुषा एक छान
शक्यतो इटली मधून
हेलावले माझे मन
आण सोनियासी सून... आण सोनियासी सून...