रताळे

  • रताळी १ किलो (२ पाऊन्ड)
  • गुळी साखर - पर्याय पांढरी साखर + गूळ अंदाजे पाव किलो
  • थोडे लोणी
  • दालचिनीची पूड १ चमचा, वेलदोड्याची पूड २ चिमटी, लवंग पूड १ चिमूट
१५ मिनिटे
३-४

सूक्ष्म-लहरी भट्टी असेल तर हा अगदी सोपा पदार्थ आहे.

अमेरिकेत रताळी - स्वीट पोटॅटो, याम, आणि गार्नेट अशा वेग-वेगळ्या स्वरूपात मिळतात.  तिन्ही चवीला साधारण सारखेच लागतात.

रताळ्यांचे दीडदोन इंच आकाराचे तुकडे करून घ्या.  त्यांना हलक्या हाताने थोडे लोणी लावा.  भट्टीत ठेवण्यायोग्य (सूक्ष्मलहरी किंवा साध्या भट्टी, जशी असेल त्याप्रमाणे)भांड्यात ते पसरून ठेवा.  गुळीसाखरेमध्ये दालचिनी, वेलदोडा, लवंग याच्या पुडी मिसळून ती रताळ्याच्या फोडीवर पसरून टाका.

सूक्ष्मलहरी भट्टीमध्ये झाकण ठेवून ५-७ मिनिटे भाजून घ्या.  साध्या भट्टीमध्ये ३५० फॅ. तपमानावर २० मिनिटे भाजावे लागेल.

खायला तयार.  आहे कि नाही सोपा पदार्थ.  सांगा कसे वाटते ते.

सुभाष

नाहीत.

प्रयोगशीलता