बायकोस....

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि असंख्य सावरकर प्रेमींची  विनम्र माफी मागून 'सागरास.. ' ह्या त्यांच्या अप्रतिम आणि अत्यंत पवित्र अशा काव्याचं विडंबन करण्याचा एक प्रयत्न....
दे मजसी दे, काहीतरी खायाला
काक हा जठरी कवकवला....
ह्या हातानि, पात्रे मोरीमध्ये धुता
मी नित्य खाल्ल्या लाथा
मज वदली तू, माझ्या घरामध्ये राहू
घरचाच 'बिझनेस' पाहू
तव वदनी हे, मन प्रलोभित झाले
त्वरे तुला वचन मी दिधले
मार्गज्ञ त्वये, मीच पिशवी वाहीन
विसरले परत आणीन
अडकलो दिल्या मम वचनी । मी
जग हसतसे फसलो पाहूनी । मी
तव कधी.. तरी.. चूकवूनी  । मी
जाईन त्वरे, पळूनी सोडूनी तुजला
संन्यास घेण्या काशीला... 
शक सासरी तो, हरीण बने उपाशी
ही दूर्गत झाली ऐशी
हा त्रास कसा, सतत साहू ह्या पूढती
दश वर्ष कधीची सरती
गुल सुमने मी, वेचितसे ह्या भावे
की तिने त्यांसी गुंफावे
फूल गुंफियले जरी,  'यूज' नसे मेंदूचा
हा व्यर्थ भाग डोक्याचा
ती मातृ हृदय वत्सलता...। रे
जरी मला पुन्हा ती कळता । रे 
रजकाचा श्वान हा होता... । रे
घरदार मला, आता पारका झाला
घाटाचा द्वारही मिटला...
जरी 'नक्षत्रे', बहुत चालूनी आली
तुज वधू म्हणुनी योजियली
प्रासाद तुझा, भव्य पाहता विस्मरलो
सदनिका स्वये कष्टाची
तुजसाथ हवे, राज्य तुज बापाचे
जावई होई तुज घरचे
आठवणे व्यर्थ हे आता.... । रे
जग अनुभवे मी ना एकटा..। रे
सह सप्तपदी मी चलता ...। रे
तव सोबतीची, शपथ स्मरूनी अग्नीला
पायावरी धोंडा मारला...
काक हा जठरी कवकवला....
ह्या 'फेना'मध्ये, वस्त्र बुडविला कैसा
'तव' समजूनीया, खास बडवीला ऐसा
तव नवर्यावर, हक्क पुरे मिरविते
त्याच्या टकली मिरे वाटिते
तव स्वामीला काक बळी समजूनी
देशील किती त्रास अजूनी?
जरी मेहुणे बंधू भयभीता..। रे
भोजन समय हा होता....। रे
वाढेल मजसी, मम कांता । रे
ही आस मनी, धरूनी विनंती तुजला
क्षमवी जठर-अग्नीला..