.
संकटकाळी हात देशील
अडचणीत मदत घेशील -
चहाडी चुगली कानावर हात
मैत्रीत नसते जातपात !
मैत्रीला लागत नाही कात्री
असते मैत्रीत पक्की खात्री -
मित्रात जेव्हां अतूट मैत्री
विश्वासाची पक्की खात्री !
उपकार होतील खूप तुझे
देवा, एकच मागणे माझे -
एकच मित्र असा मिळावा
कृष्ण-सुदामा आदर्श रहावा !
.