का साधते एव्हढी जवळीक ती
हे बोलली पण मनी वसलीच ती
केलीच टींगल जरा मी बोचरी
रागावली मजवर भलतीच ती
सांगू कसे तिला, मजबूर मी
बेशुद्ध मी केव्हढी नजदीक ती
येणार नाहीच मी आता कधी
नक्कीच आहे जरा अगतीक ती
नाहीच मी जगत आता फारसा
अन मागल्या पावली वळलीच ती
...
शेरास ह्या काफिया नसणारही
गातोच मी गझल, आज रदीफ ती