दार वाजले

आलीच ती माझ्यादिशेने चार पावले

आनंदलो, पण नेमके ते दार वाजले
ना माहिती माझ्यात तीने काय पाहिले
प्रकरण जरा माझेच होते फार गाजले
मी एकटा नाही, असे कित्येक चाहते
स्वप्नातही तीनेच होते  ठार मारले
बेशरम मी, का झापडे बांधून चालतो 
हृदयावरी पण घनघोर सारे वार जाहले
तो चोरटा हळुवार धक्का टेबलातळी
ते पाय पायी स्पर्शणारे गार लागले