देशद्रोही

रोज म्हणतो आता जातो परदेशात

सतत घेतो पडती बाजू, तीही जोशात
दबलेल्या आवाजात शब्द ते 'जय हिंद' घशात
नावे ठेवतो सावरकरांना
दोष देतो गांधीजींना
दोष रोज स्वतःच्या वडीलांना
जमत नाही ऊत्तर देणे आरोपांना
बगल देतो मुळ प्रश्नांना
महत्त्व आले आता पळवाटांना
जमणार नाही, झेपणार नाही
तरी हाव सुटत नाही
लाळ गळते पण, डाळ शिजत नाही
थुंकतो रस्त्यावर, कचरा गावभर
आणि म्हणे मी एकटा काय करणार
रोज मात्र सिंगापुरचा ऊदो करणार
कसाब आपल्यासाठी देशद्रोही
पाकिस्तानचा देशभक्त
आपण घरात बसून रवंथ करतो फक्त
चघळायला रोज लागतात आदिवासी
ही सारी गावे आहेत मुंबईपाशी
निष्ठा साऱ्या वाहिल्यात ना न्युयॉर्कपाशी
मी बोलतो आप्तांबद्दल काही बाही
मी बोलतो देशाबद्दल रोज काही
मीच तो निष्क्रिय वाचाळ, आणि खरा देशद्रोही