तुजविण

तुजविण

तुजविण उदास आभाळ
तुजविण निराश संध्याकाळ
तुजविण अधुरे गीत
तुजविण अधुरी प्रीत

गतजन्मीचे देणे तुझे
अधुरा तुजविण संसारी
द्यावयास साथ तुला
आलो मोक्षातून माघारी

राजेंद्र देवी