सावलीत काळ्या ढगाच्या, मी एकटा
कोपऱ्यात खोट्या जगाच्या, मी एकटा
वाटलेच मी गाठले मोठे टोक ते
सापळ्यात त्या हिमनगाच्या, मी एकटा
नाटके तरी मी करावी का सारखी
मारतो बढाया वगाच्या, मी एकटा
फोडले अता मी मनाचे कोठारही
धावतोच पाठी ठगाच्या, मी एकटा
राजहंस होतोच मी, ना मी जाणतो
राहतोच साथी खगाच्या, मी एकटा