नम्र होउनी, तंत्र जानूनी, यंत्र जगाचे पाहियले.. पण,
विचत्रपनाच्या जगतामधे, समजूतीचे रहस्स्य वेगळे.
सत्र संपले संकटांचे अन, सुरू जाहला प्रश्न नवा.
पुन्हा पुन्हा हो तेच ते.. म्हनुनच, समजूतीचाच आधार मला.
समज असावी रक्तामधे, विचीत्र जगती जगन्यासाठी,
समजून उमजून समजून घ्याव्यात, विचीत्रपणाच्या विचीत्र गोष्टी.
जीव तोडून खरे बोललो, तरीही मी खोटा ठरलो,
सत्याचीच ती परीक्षा होती, समजूतीने मीच जींकलो..
प्रत्येकालाच मीळते जागा, खळखळ, निर्झर वाहन्यासाठी..
कमी जरी पडली तरीही, जागच्या जागी नाचन्यासाठी.
परंतु असतात प्रत्येकालाच, खुळचट अशा मर्यादा..
म्हणूनच असावा जागेभोवती, समजूतीचा समजकीनारा.
....... सांगत असलो मीच मला, समजूतीचे बोल जरी..
विचीत्रपणाच्या यादीमध्ये, समजुतदारीही आहे थोडी