"उठ बाळा"
उठ बाळा उघडी नयन ।
आणिले पाणी करी मार्जन॥
निशा गेली कमळ फुलले ।
त्यावरी भुंगे अनेक डोले ॥
चिऊ उठे पाहा झाडावर ।
मंदवारा वाहे हा सुंदर ॥
नभी फुटे तांबडे प्राचिला ।
नवे रुप आले धरतीला ॥
सकाळ झाली सूर्य उगवला ।
नदी पात्रात डोलू लागला ॥
कोवळी कोवळी किरणे आली ।
कळ्या हासल्या फुले उमलली ॥
सुंदर क्षण हा ना दवडी ।
" उठ आता नयने उघडी "२॥
अनंत खोंडे. कोलोराडो अमेरिका.
२४।९।२०१२.