..भ्रांत नाही

कष्ट, फ़ार अविश्रांत नाही
खायची मजला भ्रांत नाही

मोडके माझे होडके हे

जाणतो ही विक्रांत नाही 
बिनसला कोठे गोडवा तो
येत आता संक्रांत नाही
चालली लांब छबी प्रियेची
क्षेत्र ते पादाक्रांत नाही
प्रेम नाही केले कधीही
हाय ! हा माझा प्रांत नाही