गाणे ओळखा

गागागागा गागागागा गागागा गागागागा
गागागागा गागागागा गागागा गागागागा ॥धृ॥

निष्ठुरशा सजणाने मजला दुःखाग्नित त्या जाळिले
विरहाचे चटकेही तयाने या नशिबी मजला दिले
अविरत झरती डोळे, दुःखी मनही बोलविते तुजला ॥१॥

मी आले होते, या नयनी प्रीति-स्वप्ने घेउनी
जाते साश्रू नयनांनी अन् घोर निराशा लेउनी
या विश्वाच्या हलकल्लोळी हरवून बसले मी मजला॥२॥

ओढ तुला बघण्याची डोळां, आता त्यां निद्रा न लगे
विरहाच्या रात्री जागविते घेउनी अश्रूंना संगे
जीवन मी कंठावे कैसे काहिच रे नुमजे मजला॥३॥