तुमचे अस्तित्व

    बाबा तुम्ही आज

    बोलत नाही का
    गेलेल्या दिवसांची
    खंत उरी का ?
    आमच्या साठी तुम्ही 
    हासत जगाव
  नाहीच कुणी बोलत
  म्हनुण उगीच रुसाव
  घडलेल्या कही घटना
    तुम्हाला का सांगाव
    नकाच तुम्ही आता
  संसारात गुंताव
तुमच असन आमच्यासाठी
फार फार मोलाच
नका म्हणू तुम्ही
म्हातारपण आल्याच
पक्का होता तुमचा पाया
भिंत मात्र आम्ही बांधतो
घरकुल जरी तुमचे
वारसा आम्ही चालवतो
  संसारात लढता लढता
  थकुनही फार जातो
अशा वेळी तुमची थाप
    पाठीवर मागतो
नातवंडाचे लाड सारे
तुम्ही हो केले
न कळत आज ते 
संस्कारीत झाले
  नकाच म्हणू तुम्ही आज
आमचे ओझे झाले
तुमच्याच सहवासाने
      सार्थक जन्माचे झाले