नजर...

नजर...

तुझी पाणावलेली नजर
सारे काही सांगून गेली
माझ्या स्वप्नांना
ओली नजर लावून गेली

स्वप्नांनाही भिजविले
मी अनेक रात्री
आठवणीत वेचल्या
मी अनेक रात्री

आठवतो अजूनही
तुझी नजर ति ओली
अजूनही मोजतो आहे
मी माझ्या जखमांची खोली

राजेंद्र देवी