माती

रूप अव्हेरिलेस मातीचे

अव्हेरणार गंध कसा ?
चराचर बुडले आकंठ त्यांत 
शेवटही तिच्याच गंधात 
मातीचेच वास सगळे 
मातीचेच रंग सगळे 
मातीचीच सारी दुनिया
मातीचेच नयन पाहती 
जातीसाठी खाशी माती 
धर्मासाठी खाशी माती 
अन्नान्न होता खाशी माती
परी तियेला दूर सारीशी 
सांगतो नवी बातमी 
वाढती मातीच्या किमती 
माती खाणेही महाग
माती पचवणेही महाग 
मातीत भेदाभेद करीशी 
मातीलाच आलिंगन देशी 
का तुला जाणवत नाही 
अंतरातली समान माती