आडोशाला आशेचे मुटकुळे
आणि कवडशांचा विक्राळ नाच
लाथाडलेली करवंटी
आणि हीव भरलेली आकांक्षा
तुऱ्याचे वाऱ्याशी साटेलोटे
आणि फिस्कारलेला पसारअ
वळचणीतले अधोमुख भेंडोळे
आणि कुंडलिनीचे मेदूत चित्कार
श्रीमंत कोंदणांची मिजास
आणि दुमडलेली आयुष्यरेषा
संवेदनांचा करपट हुंकार
आणि कोंडमाऱ्यातील माणुसकी
ढगाळलेल्या तारुण्याची धुसफुस
आणि पत्रावळीचा ढीला टाका
दीशाहीन रक्तवाहिन्या
आणि आडमुठ्या पेशींचा स्फ़ोट