शिवराय

अवनी वरती नृप जाहले, अगणित आजवरी ।

परी शिवरायांसम नाही जाहला कोणी नृपकेसरी ॥
अगणित आले अगणित गेले नसे काही गणती ।
अमर जाहले शिवराय केली अघटित ऐसी कृती ॥
कड्या कपारी फिरूनी एक एक सवंगडी शोधीला ।
अमोघ वाणीने त्यांच्यातील मराठी बाणा जागविला ॥
शुन्यातूनी विश्व निर्मिले दिली झुंजार कडवी झुंज ।
टक्कर देऊनी महासाम्राजांशी उतरविला दुष्टांचा माज ॥
रयतेचा वाली गरिबांचा राजा सज्जनांचा कैवारी ।
ऐसी ख्याती शिवरायांची दुमदुमते भूवरी ॥
॥जय शिवराय, जय जिजाऊ ॥