खेळ भातुकलीचा

   एक खई दुरखई

  सागरगोट्या ह्या खेळल्या
एक गोटी उंचावली
आठवाणी ग जागल्या
  खेळ खिपऱ्याचा असा
रंगला ग अंगणी
एक पडली खिपरी
भरल ओंजळीन पाणी
भातुकली चा ग खेळ
शेनाचा केला वाडा
लग्न बाहुलीचे होते
भरल्या डोळ्याच्या ग कडा
तारुण्य ग बहारल 
लाज   थोडीच कळली
संगे घेउन सखीला
खेळ खेळले ओसरी
ओसरीच्या जात्यावर
ओवी गाईली आईन
लेक मोठी झाल्याची
सांगितल ग गाउन
झिम्मा फुगडी विसावली
खेळ सारे ग संपले
विसावल बालपण
युवराज स्वप्नी आले
संपताच भातुकली
हळद लागली अंगाला
बाजुच्याच वाड्यातला
वर बापान शोधला