कवडसा

कवडसा

पुनवेचा कवडसा
माझ्या हाताशी आला
पकडू पाहता
मुठीत नाही आला

आभाळिचा थेंब
मस्तकी आला
झिरपुनी तो
नयनी सामावला

पारिजातकाचा सडा
दारी घमघमाटला
आठवणीने तुझ्या
हा कंठ दाटला

राजेंद्र देवी