भाबड्या मनाने परमेश्वरा कडे मागितलेली .......आयुष्याची संध्याकाळ
आयुष्याच्या संध्याकाळी
मनात नसूदे कुठलीचं खंत
हे करायचे होते ...ते राहूनच गेले
असे म्हणण्यास जिभेला पण नको मिळूदे उसंत
आयुष्याच्या संध्याकाळी
वारा असूदे मंद
जो हळुवार घेऊन येऊ दे आठवणींचा गंध
आयुष्याच्या संध्याकाळी
आकाशात नको असूदेत काळे ढ
ते निरभ्र असेल तरच मी येईल बघ
आयुष्याच्या संध्याकाळी
ती अखेरची झेप असूदे स्वच्छंद आणि समाधानी
ते बघून कोकिळालाही गाऊ दे ..आनंदाने मंजुळ गाणी
आयुष्याच्या संध्याकाळी
मला ... असूदेत एकला
नाही बघवत रे .... जाता पाणी डोळ्याला
-----------शब्दवेडी