काही शब्दकळा...

१. पोच...
सगळा नुसता
मनाचा खेळ
आणि 
शब्द नुसते
अर्थवाही हमाल
तुमच्या पर्यंत 
संदर्भाच्या रस्ताने 
पोचणारे...
कधी 
रस्ता चुकलाच
तर गैरसमजाची
पोच
परत आणणारे 
२. बोलका...
तुझ्याकडे गेलेले
माझे शब्द
काल
मौनाच्या वेशीवरु परतले
शब्द आहेत समजूतदार 
गप्प बसतील...
पण
परत येताना 
त्यांच्या सोबत
आलेला अबोला
खूपच
बोलका आहे...