......काळ आला

माझ्यावरी नको तो आळ आला

आवाज तोच रानोमाळ झाला
स्वप्ने मनात होती गाडली मी
का नेहमीच हाती गाळ आला?
ऊद्देश हाच होता मदत व्हावी
वाटेत कोण हा नाठाळ आला?
फाडून फेकले गुपितास माझ्या
त्या जंगलात आता जाळ झाला
आयुष्य गुंफले मी शांततेला
का कारभार हा ढीसाळ झाला?
आत्ता कुठे जगाया लागलो मी
लाडात त्याच वेळी काळ आला