रान...
रान मनात वसलं
पान पान तरारलं
रंग हिरवा लेऊन
सारं काळीज दाटलं
काळी भुई होती साधी
जरा बरड बरड
थेंब येता अवकाळी
कोंब उगवलं ग्वाड
निरखितो मीच मला
जरा दुरुन दुरुन
तण माजता माजता
घेतो जरा खुरपून
उन्हा वार्याचा तो जोर
देतो जोम जगण्यास
हिरवाई जपताना
उगा मानावा का त्रास....