चीज बटाटा टॉपिंग्स

  • ४ उकडलेले बटाटे
  • १ बाजारात मिळणारा चीज ठोकळा
  • १ चमचा चाट मसाला
  • १ चमचा मिरपूड
  • १ चमचा तिखट,मीठ,कोथिंबीर हवी असल्यास
  • सूक्ष्मलहरी भट्टी अथवा तवा-गॅस
१५ मिनिटे
फडशा पाडणाऱ्याच्या भुकेवर अवलंबून. करता करता करणाऱ्याकडूनच चट्टामट्टा होण्याची दाट शक्यता

१. उकडलेल्या बटाट्याच्या जाड चकत्या कराव्यात. (बटाटे खूप मऊ शिजवू नये, तसे झाल्यास चकत्यांचे तुकडे होऊन पोपट होईल.)
२. चीज ठोकळा किसून घ्यावा.
३. सर्व चकत्या मांडून त्यावर किसलेले चीज टाकावे.
४. चीजच्या थरावर चकतीच्या मध्यभागी गोलाकारात चाट मसाला व मिरपूड टाकावी.
५. चकतीच्या बाहेरच्या बाजूने तिखटाचा थर एकसमान पसरावा. आतला गोल मिरपूड-चाट मसाला, बाहेरचा गोल तिखट पूड.
६. मीठ हलकेच पसरावे. कमीच पसरावे कारण चीज मधे असते.
७. सूक्ष्मलहरी भट्टीत ६०% शक्तीवर ३ मिनीटे भाजावे. किंवा मधून मधून उघडून पहावे. चीज वितळले कि झाले असे समजावे. मेणाच्या रांगोळीसारखे आधी वर असलेले तिखट चाट मसाला ई. चीजच्या जरा खाली गेलेले दिसले पाहिजे.
८. सूक्ष्मलहरी भट्टी नसल्यास तव्यावर अगदी मंद आचेवर झाकण घालून काही काळ ठेवावे. उलटू नये.
९. खाण्याच्या आधी हे गरम गरम खावे. चीजची भाजलेली चव, बट्टाटा, आणि आवडते मसाले..वर हवी असल्यास कोथिंबीर. कधीही ताटात उरत नाहीत. नेहमी कमीच पडतात.  

बटाट्यावरील घटक आवडीप्रमाणे बदलून प्रयोग करुन पहावेत आणि यशस्वी झाल्यास मनोगतावर प्रकाशित करावेत.

माझी एकमेव परदेशी मैत्रिण